Maza Gaon Maza Desh Campaign

A Movement for Change

At DOBA India, we believe in driving meaningful transformation through grassroots initiatives. Our “Maza Gaon, Maza Desh” campaign is an offline movement dedicated to community development, environmental conservation, and social empowerment. This initiative brings together people from all walks of life—students, women, farmers, urban and rural communities—to create a better, more responsible society.

 

Education & Awareness

Spreading knowledge through Abhyasalay’s to provide quality education and enhance learning opportunities in rural and urban areas.

Empowerment & Sensitization

Encouraging social responsibility through initiatives like voting awareness campaigns and protests against hill encroachment, ensuring community voices are heard.

Environmental Conservation

Leading impactful movements such as tree plantation drives, Mutha river belt garbage clearance, and save & conserve water campaigns, promoting sustainable living.

Health & Well-being

Raising awareness about sound pollution and its impact on health, advocating for better noise control measures in both urban and rural areas.

Distress Assistance & Social Support

Supporting communities in times of crisis through on-ground relief efforts, ensuring immediate and long-term aid for those in need.

Through “Maza Gaon, Maza Desh, DOBA India is bridging the gap between awareness and actionensuring every campaign leads to real, tangible change.

संस्थेची ओळख
यमुनाबाई मारूती लडकत संस्थापित ‘माझं गाव माझा देश’ मागील काही वर्षापासून लोकोपयोगी विविध उपक्रम राबवित आहेत.विविध विषयांबाबत जागृती, चांगल्याला प्रोत्साहन, माहिती, अंधश्रद्वा, पर्यावरण, प्रदुषण, शिक्षण, शेती यांसारख्या विषयांवर माझं गाव माझा देश, महाराष्ट्र व इतर काही राज्यांमध्ये काम करीत आहे. विविध मार्गाने प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा, त्यांना समजावून सांगण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. भाकरी देण्यापेक्षा भाकरी कशी मिळवावी ? अशा दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.घरोघरी,कार्यालयांमध्ये,दुकानांमध्ये, गावोगावी, गर्दीच्या ठिकाणी, लोकांशी संवाद साधून, माहिती पत्रके, बॅनर्स,तोंडी स्वरूपात या माध्यमातून सदर संस्थेद्वारे राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व अनेक गावांशी संपर्क साधून आहे व त्याप्रमाणे असे उपक्रम राबविले जातात. याकामी ४० ते ५० कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत. उपक्रमामध्ये वेळोवेळी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ४०० ते ५०० कार्यकर्ते – नागरीक यांचा सहभाग असतो.

माझं गाव माझा देश – पुणे ने आतापर्यंत राबविले उपक्रम

१) गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांसाठी ध्वनि प्रदुषण नियंत्रण स्पर्धा, पुणे ३००० मंडळांचा सहभाग
२) गरजू विदयार्थ्यांसाठी २० अभ्यासालय झोपडपट्टी सारख्या भागांत जागा मिळवून चालविले जातात. परिक्षा काळात तज्ञ व्यक्तींच्या मदतीने मार्गदर्शन वर्ग, सहलीचे आयोजन. अभ्यासालया अंतर्गत विदयार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन. प्रतिवर्षी साधारण ८०० ते ९०० विदयार्थ्यांचा सहभाग.
३) जि.प., न.प, म.पा, विधानसभा, लोकसभा निवडणूकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याकरीता महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा या ठिकाणी मतदान जागृती अभियान. आतापर्यंत लाखो मतदारांशी संपर्क.
४) जत्रा, उत्सव, उरूस यासारख्या वेळी व ठिकाणी तेथे आवश्यक त्या विषयाबाबत जागृती अभियान उदा. शेती, पर्यावरण, अंधश्रद्वा, सुरक्षितता, माहिती इ.
५) शुन्य कचरा व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग.-
६) ‘गावाची माहिती जगाला जगाची माहिती गावाला’ या अंतर्गत गावातील, व्यक्तींमधील विशेष गुणांची दखल घेण्याच्या दृष्टिने राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, हजारो गावाशी संपर्क.
७) देहू-आळंदी-पंढरपूर पालखी दरम्यान सावधान, सुरक्षितता, स्वच्छता या दृष्टिने गेली ८ वर्षापासून उपक्रम, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी प्रमुखांशी संपर्क साधून माहिती देणे, पालखी मार्गावर, दिंडी बोर्ड, माहितीपत्रक, बॅनर्स याद्वारे जागृती.
८) चोऱ्या यासारख्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टिने जेष्ठ नागरिक, सोसायटया, अपार्टमेंट मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिने घ्यावयाची काळजी याबाबत शहरात प्रत्येक इमारतींमध्ये जावून सोसायटयांमध्ये माहितीपत्रक व महत्व समजावून सांगणे अशा प्रकारचे सुरक्षितता अभियान.
९) ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिने शहरा लगतच्या लहान-मोठया कंपन्यांशी संपर्क साधून गरजू मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
१०) मा.गा.मा.दे.स्वतःशी संलग्न डोबा मार्केटींग द्वारा आजपर्यंत ४००० वर मुला-मुलींना अर्धवेळ रोजगार दिला. आता ५० पेक्षा अधिक मुले कायम स्वरूपी काम करीत आहेत तर २०० मुलांचे अर्धवेळ काम सुरू आहे.)
११) विविध परिक्षांमध्ये उर्त्तीर्ण विदयार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रोत्साहीत करित आहोत.
१२) महिला, युवतींना उपयुक्त ठरतील अशा २-३ दिवसांचे वेगवेगळया कोर्सेसची व्यवस्था. ज्वेलरी, खेळणी, पणत्या बनविणे,डिझाईन करणे, डान्स,आरोग्य,मेहंदी,स्वयंपाक, इ.
१३) विकास आराखडा संदर्भामध्ये ‘हरित पुणे’ आंदोलनासाठी सहयांच्या मोहिमे अंतर्गत हजारोंचा सक्रिय सहभाग.
१४) रिक्षा बंद काळात दुचाकी, चारचाकी अशा अनेक वाहनांमधून प्रवाशांना वाहतूकीची विनामूल्य सेवा.